दुचाकीवरील एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू; जळगावात भीषण अपघात
जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे हे सर्व सहाजण दुचाकीवर होते. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
ही घटना पाहिलेल्यांनी त्यांचे हृदय पिळवटून निघाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जामनेर तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. यात तीन बालकांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी (15 ऑक्टोबर 2026) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जामनेर तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ ही भीषण दुर्घटना घडली. दुचाकीवर सहाजण होते आणि दुचाकी – ट्रक यांच्यात धडक होऊन सहाजणांचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमधील रहिवासी होत्या, अशी माहिती मिळते. या अपघातातील सर्व मृत एकाच घरातील होते. त्यामुळे या अपघातात एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, ट्रकची धडक कशा प्रकारे बसली, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, मदतकर्त्याने सांगितले की, त्यात तीन मोठी माणसे आणि तीन बाळ होते. कोणत्या गाडीने टक्कर दिली किंवा कोण कोणत्या गाडीत होते, हे माहीत नाही. गाडी वगैरे मी काहीही पाहिले नाही. मात्र, मृतदेह रस्त्यावर फेकल्याप्रमाणे पडले होते, असे त्यांनी सांगितले.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











