महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय, आता अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणार आरक्षण
महाराष्ट्र शासनाने राज्यातील तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे कि आता महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांना विशेष आरक्षण दिले जाणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करत, केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेल्या २८२ नौदल (नेवी) अग्निवीरांच्या पहिल्या यादीला अधिकृत मान्यता देण्यात आली असून त्यांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये १५० सीमैन डेकसाइड आणि १३२ सीमैन इंजनसाइडचा समावेश आहे आणि या सर्व जवानांना नियुक्तीचे आदेश सुपूर्द करण्यात आले आहेत.
यापूर्वी आसाम आणि गुजरातसह इतर राज्यांनीही अग्निवीरांच्या हिताचे असे निर्णय घेतले आहेत, ज्याच्या माध्यमातून देशाचे रक्षण करणाऱ्या या शिस्तप्रिय आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या तरुणांना भविष्यात उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.












