लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

सोनं-चांदीच्या बाजारात जानेवारी महिन्यात जी तेजी पाहायला मिळाली होती, त्याच प्रमाणात मोठी घसरण सध्या नोव्हेंबर महिन्यात दिसून येत आहे. आज सलग दहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली असून, सोनं तब्बल 15 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.
जानेवारीतील उच्चांकाच्या तुलनेत सोन्याचे दर तब्बल 50 हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे लग्नाचा सीझन सुरू होण्यापूर्वी सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याचा भाव
Goodreturns वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार आज सकाळी दिल्लीच्या सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 2,570 रुपयांनी घसरून 1,30,840 रुपये झाला तर 22 कॅरेटचा भाव 2,350 रुपयांनी घसरून 1,19, 950 रुपये झाला आहे.
तसेच 24 कॅरेट सोन्याचा भाव मुंबईमध्ये ₹1,30,690, चेन्नईमध्ये आणि गोवामध्येही ₹1,30,690 इतका आहे.
दरम्यान, आजच्या MCX बाजारात सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,29,500 रुपये इतका झाला आहे तर चांदीचा भाव प्रति किलो ₹ 1,60,900 रुपयांना विकली जात आहे.
चांदीचा भाव
आज दिल्लीमध्ये चांदीचा भाव प्रति किलो ₹1,80,000 प्रति किलो झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून चांदीचा भाव ₹30,000 रुपयांनी घसरला आहे. देशातील इतर शहरांकडे पाहिले तर मुंबई आणि कोलकाता येथेही चांदी ह्याच दराने उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील सोने-चांदीचे भाव
शहर 22 कॅरेट सोनं (प्रति 10 ग्रॅम) चांदी( प्रति किलो)
मुंबई ₹1,19,800 ₹1,80,000
पुणे ₹1,19,800 ₹1,80,000
नागपूर ₹1,19,800 ₹1,80,000
कोल्हापूर ₹1,19,800 ₹1,80,000
जळगाव ₹1,19,800 ₹1,80,000
एकंदरीतच, महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति तोळा विना जीएसटी ₹1,19,800 तर चांदीचे भाव प्रति किलो ₹1,80,000 इतका आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











