बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. काही मंत्र्यांच्या घरांना टार्गेट करून हल्ले करण्यात आली. याचदरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी थेट नाव न घेता भारतावर निशाणा साधला.
आवामी लीग विरोधातील लढाईत सर्वांनी एकत्र यावे असे त्यांनी म्हटले. तारिक रहमान गेल्या काही दिवसांपासून विविध देशांचे दाैरे करत आहेत. पण भारत दाैऱ्यावर येण्याकरिता त्यांच्याकडे वेळ नाही. भारताने आमंत्रण देऊनही त्यांनी भारत दाैरा टाळला. त्यातच आता नाव न घेता त्यांना भारतावर जोरदार टीका केली. आवामी लीग पार्टी माजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची आहे. 2024 मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्या बांगलादेश सोडून भारतात आल्या. तारिक रहमान यांनी म्हटले की, एका समुहाने आपल्या देशाविरोधात कट रचला आणि त्याची मुख्यकर्ता तिथेच राहतो.
तारिक रहमान यांचे म्हणणे आहे की, सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे जे 2024 च्या संघर्षात होते. तारिक रहमान यांनी म्हटले की, आता खूप जास्त झाले आहे. आम्हाला या दहशतवाद्यांना, हत्या करणाऱ्यांना आणि आग लावणाऱ्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. त्यांचे म्हणणे आहे की, एक दहशतवादी संघटना देशाविरोधात मोठा कट रचत आहे. आवामी लीग या पक्षाला त्यांनी अगोदरच दहशतवादी म्हटले आहे.
पुढे तारीक रहमान यांनी म्हटले की, मी तुम्हाला सांगत आहे तसे एक मोठा समूह आपल्या देशाविरोधात कट रचत आहे. सीमा ओलांडून ते ज्या देशात पळून गेले तिथेच कट रचला जात आहे. ते आपल्या नेत्याला खुश करणाऱ्यांसाठी हे करत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.
शेख हसीना यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले की, त्या बांगलादेशात परतणार आहेत. बांगलादेशात त्यांच्या विरोधात काही सुनावणी कोर्टात सुरू आहेत. मात्र, शेख हसीना नक्की कधी बांगलादेशात परतणार याबाबत काही माहिती येऊ शकली नाही. मोहम्मद यूनुस यांचे घर जाळल्याने तारिक रहमान यांना मिरच्या लागल्या आहेत. भारताचे थेट नाव न घेतल्याने भारत यावरकाही बोलण्याची शक्यता कमीच आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











