मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

मंत्रालयातील शिक्षण विभागाचा सचिव दर्जाचा अधिकारी असल्याचे सांगत तपासणीस आलेल्या तोतया अधिकाऱ्याचा धाराशिव शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीच पर्दाफाश केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृह आणि शाळा तपासणीस आल्याने, शासकीय सुविधा आणि देवदर्शनाची सोय करण्याची तोतया अधिकाऱ्याने मागणी केली होती.
…अन् तिथेच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय
शासकीय विश्रामगृहात व्हीआयपी सूट बुकिंग करण्यासाठी बनावट ओळखपत्राचा वापर देखील करण्यात आला. शिक्षण अधिकारी सुधा साळुंखे आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने सापळा रचून शासकीय विश्रामगृहात बनावट अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
तोतया अधिकारी पकडल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ
श्रीकांत डोईफोडे असं या तोतया अधिकाऱ्याचं नाव असून उपशिक्षणाधिकारी दिनकर अंबादास होळकर यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोतया अधिकारी पकडल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. धाराशिव पोलीस पुढील तपास करत आहे.
मी शिक्षण विभागात सचिव, आयकार्डही दाखवलं, देवदर्शनाची सोय करण्याची मागणी
-मंत्रालयातील शिक्षण विभागाचा सचिव दर्जाचा अधिकारी असल्याचे सांगत धाराशिवमध्ये तोतया अधिकारी तपासणीस आला होता. जिल्ह्यातील अनुदानित वसतीगृह आणि शाळा तपासणीस आल्याने, शासकीय सुविधा आणि देवदर्शनाची सोय करण्याची मागणी तोतया अधिकाऱ्याने केली होती. यावेळी त्याने शासकीय विश्रामगृहात व्हीआयपी सूट बुकिंग करण्यासाठी बनावट ओळखपत्राचा वापर देखील केला.
शिक्षण अधिकारी सुधा साळुंखे आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनात काही कारणांनी संशयाची पाल चुकचुकली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतली. अधिकची चौकशी केली असता तो तोतया अधिकारी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
उपशिक्षणाधिकारी दिनकर अंबादास होळकर यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव पोलीस पुढील तपास करत आहेत. तोतया अधिकारी पकडल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











