बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

जळगाव साफसफाई व कचरा संकलन करणारा मक्तेदार बी.व्ही.जी. कंपनीचे काम असमनाधाकारक असतांनाही प्रशासना त्यांचा मक्ता का रदद करत नाही.
व्यासपिठावर अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, पंकज गोसावी, संजय राऊत, नगरसचिव मनोज शर्मा, शहर अभियंता आर. टी.पाटील, मुख्य लेखाधिकारी राजू लाकुडझोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ उपस्थित होते. स्थायी समितीच्या सूरुवातीला सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय तसेच १२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यानच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांचा अद्ययावत अहवालाची माहिती घेण्यात आली. याशिवाय ऑगस्ट महिन्यातील अग्निशमन विभागाचा आगीच्या घटनांचा अहवाल व साप्ताहिक लेखापरीक्षण अहवालाची माहिती घेण्यात आली.
वॉटर मिटरची माहिती द्या, लेखाजोखाही मांडावा
नळांना वॉटर मिटर बाबत प्रश्न उपस्थित केला. मिटर बसविण्याचे काम व्यवस्थित न होणे, कमी दाब वेण्यासह आदी स्थायी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी स्थायी सदस्य अॅड. पोकळे यांनी थेट हे मीटर बसविण्याच्या कामात मोठा गैरव्यवाहर होत असून पुढील बैठकीत या वॉटर मीटरच्या सर्व लेखाजोखा व माहिती सभेपुढे सादर करण्याच्या सूचना दिल्या.
सफाई मक्तेदारावर संताप, अनेकांनी मांडली मते
बीव्हीजी कंपनीकडून कचरा संकलनाचा क्यूआर कोड स्कॅनचे काम किती होत आहे? कचरा संकलन करतांना कर्मचारी माती, दगड भरून कचर्याचे वजन वाढविण्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे. तसेच दिवाळीत अचानक कचरा संकलनात कशी वाढ झाली याबाबत विष्णू भंगाळे, अॅड, दिलीप पोकळे, नितीन सपके, दिपक सूर्यवंशी व नितीन लड्डा यांनी सभेत विचारणा करून संताप व्यक्त केला. दिवाळीत शहरात कचरा संकलन कसे वाढले याची देखील विचारणा केली.
यावेळी उपायुक्त निर्मला गायकवाड यानी कचरा संकलनात मक्तेदारांकडून अतिरिक्त वाहन लीवल असल्यान कचरा संकलनात वाढ झालेली आहे असे सांगितले. त्यावर सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. जर बी.व्ही.जी.चे काम समाधानकार नाही असे वारंवार सांगितले जात आहे. तरी प्रशासन त्याचा मक्ता का रद्द करीत नाही? अधिकारी सभेत उपस्थित राहतात. परंतु कोणतीही कार्यवाही करीत नाही. ते सभेत का उपस्थित राहतात? असा सवाल उपस्थित केला. आयुक्त स्थायी सभेत का उपस्थित राहत नाही असा सवालही त्यांनी केला.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











