
देशभरातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘पब्लिक एक्झामिनेशन (प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स) ॲक्ट, 2024’ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करणाऱ्या अँटी-पेपर लीक सुधारणा विधेयकाला मंजुरी घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, गैरप्रकार आणि संघटित रॅकेट्सवर अधिक प्रभावीपणे लगाम घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सरकारने आणलेल्या या सुधारित विधेयकानुसार, पेपरफुटी करणाऱ्या आरोपींना 10 वर्षांपर्यंतचा कठोर कारावास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद यात आहे. तसेच पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या टोळ्या, परीक्षा केंद्रांतील भ्रष्ट अधिकारी, दलाल आणि अन्य संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे अधिकारही या कायद्यात अधिक मजबूत करण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांत NEET, UGC-NET आणि इतर अनेक भरती व स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आली होती. या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, सुरक्षितता आणि विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी हा कठोर निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे सुधारणा विधेयक येत्या सोमवारी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि राज्यसभेत ते मंजूर करून घेण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली असून, हे विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरातील सार्वजनिक परीक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी कठोर कायदेशीर चौकट उपलब्ध होणार आहे.
सरकारच्या मते, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत होते. त्यामुळे अशा गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे, संघटित पेपर लीक रॅकेट्सचे कंबरडे मोडणे आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालणे हा या सुधारित कायद्यामागील प्रमुख उद्देश आहे.
विद्यार्थी संघटना आणि पालकांकडूनही या निर्णयाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असून, संसदेत विधेयक मंजूर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आआहे


व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











