नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू होते. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभाग घेतला. देशभरातून हजारो विद्यार्थी दिल्लीत दाखल झाल्याने आंदोलनाने व्यापक स्वरूप धारण केले.
20 जुलै रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच लाठीचार्जही केला. या घटनेनंतर केंद्र सरकारवर विरोधकांसह विविध विद्यार्थी संघटनांकडून मोठा दबाव निर्माण झाला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनीही उपोषण सुरू केले होते. सलग 25 दिवस उपोषण केल्यानंतर त्यांनी 26 व्या दिवशी ते मागे घेतले. मात्र, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी कायम ठेवली होती.
शुक्रवारी सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळामध्ये महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीतही पक्षाने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली. सरकारने निर्णयासाठी शनिवारी दुपारपर्यंतचा वेळ मागितला होता. मात्र, त्याआधीच धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने आंदोलनकर्त्यांनी याला मोठा विजय असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीत पुढील राजकीय घडामोडी, केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य बदल आणि शिक्षण खात्याबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार पुढे कोणता निर्णय घेते आणि नव्या शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती कधी होते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











