(जाहीरात पुरस्कृत)
जळगावात प्रथमच राज्यस्तरीय ‘सकल ज्ञान महोत्सव २०२६’; शिक्षण, कला, साहित्य, संस्कृती आणि कृषी क्षेत्राचा भव्य संगम
जळगाव | प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्राला एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘राज्यस्तरीय सकल ज्ञान महोत्सव २०२६’ यंदा जळगाव शहरात प्रथमच आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा शैक्षणिक महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे हे सहावे वर्ष असून, शिक्षण, कला, संस्कृती, साहित्य आणि कृषी क्षेत्रातील विविध संस्था, तज्ज्ञ आणि विद्यार्थी यांना एकाच मंचावर येण्याची संधी मिळणार आहे.
हा महोत्सव २३, २६, २७ आणि २८ डिसेंबर २०२६ या कालावधीत सागर पार्क, महाबळ रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.
महोत्सवात शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, कोचिंग क्लासेस, प्रकाशक, शैक्षणिक साहित्य विक्रेते तसेच कृषी क्षेत्रातील नामांकित स्टॉल्स सहभागी होणार आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विविध पर्याय, आधुनिक शैक्षणिक साधने आणि नव्या संधींबाबत माहिती मिळणार आहे.
आयोजकांकडून महोत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ₹१०,००० किमतीचे शैक्षणिक डिस्काउंट कूपन मोफत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच महोत्सवादरम्यान राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार असून, हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
दरम्यान, महोत्सवासाठी स्टॉल बुकिंग सुरू झाले असून, शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, कोचिंग सेंटर्स, शैक्षणिक व कृषी उत्पादक, प्रकाशक तसेच व्यावसायिकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राज्यातील शिक्षण, ज्ञान आणि नवकल्पनांचा उत्सव ठरणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











