अखेर CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, आशुतोष रांका व सौरव दास सहसंयोजक
नवी दिल्ली : अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने अखेर राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर पक्षाने देशभरात संघटन विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
पक्षाच्या निवेदनानुसार, पुढील सहा महिन्यांत राज्यस्तरीय समन्वय समित्या तसेच लोकसभा मतदारसंघनिहाय संघटन उभारण्यात येणार आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीव्यतिरिक्त इतर कोणालाही अद्याप पक्षपद देण्यात आलेले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रमुख पदे पुढीलप्रमाणे आहेत :
अभिजीत दीपके – संस्थापक व राष्ट्रीय संयोजक
आशुतोष रांका – सहसंयोजक
सौरव दास – सहसंयोजक
अजिंक्य शिंदे – राष्ट्रीय संघटन प्रभारी
दीपक बालियान – संघटन सहप्रभारी
आफरीन नवाज – राष्ट्रीय सचिव
विजय रेड्डी मल्लांगी – मीडिया प्रमुख
रत्ना सिंह – कायदेशीर प्रकरणांचे प्रमुख
वैष्णवी गौड – रिसर्च अँड पॉलिसी प्रमुख
रोहन देशपांडे – तंत्रज्ञान प्रमुख
योगेश इंगळे – वित्त प्रमुख
विभागीय प्रभारीही जाहीर
पक्षाने विभागनिहाय प्रभारींचीही घोषणा केली आहे. त्यानुसार दीपक बालियान यांच्याकडे उत्तर विभाग, विजय रेड्डी मल्लांगी यांच्याकडे दक्षिण विभाग, अंकित भारद्वाज यांच्याकडे पूर्व व ईशान्य विभाग, तर योगेश इंगळे यांच्याकडे पश्चिम विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोअर कमिटीवरून वाद
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाच्या कोअर कमिटीच्या स्थापनेवरून वाद निर्माण झाला आहे. अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानाबाहेर काही युवकांनी आंदोलन करत पक्षात घराणेशाही व पक्षपात होत असल्याचा आरोप केला.
आंदोलकांचे म्हणणे आहे की, जंतर-मंतर आंदोलनात देशभरातील सुमारे ४५० समन्वयकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र, कोअर कमिटीच्या बैठकीसाठी केवळ काही निवडक व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आणि आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना डावलण्यात आले.
युवकांनी पक्षाच्या प्रवक्ते आशुतोष रांका यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचा दावा करत, आंदोलनाशी संबंधित सर्व समन्वयकांना पक्षाच्या संघटनात्मक प्रक्रियेत प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










