संघर्षातून यशाचा प्रवास शब्दबद्ध करणारे ‘पट्यारा’ ठरले मार्गदर्शक; जळगावात ‘लेखकाचे अभिवाचन’ कार्यक्रम उत्साहात
जळगाव : ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणाने अत्यंत प्रतिकूल आणि अपवादात्मक परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःला सिद्ध करून एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदापर्यंत मजल मारली. या प्रेरणादायी जीवनप्रवासाला शब्दबद्ध करणारे ‘पाट्यारा’ हे आत्मकथन पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणारे आहे. याच पुस्तकाच्या निमित्ताने जळगावात ‘परिवर्तन’तर्फे ‘लेखकाचे अभिवाचन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील संतोष नागो शिंदे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे अतिशय प्रभावी आणि संवेदनशील शब्दांकन या आत्मकथनात करण्यात आले आहे. ग्रामीण आणि सामान्य परिस्थितीतून पुढे येताना शिक्षण, परिस्थितीशी संघर्ष, सामाजिक वास्तव आणि आयुष्यात आलेल्या विविध अडचणींवर मात करत त्यांनी मिळविलेले यश या पुस्तकातून उलगडते.
कार्यक्रमादरम्यान लेखक संतोष नागो पाटील यांनी आपल्या जीवनातील अनेक अनुभव उपस्थितांसमोर मांडले. विशेषतः महात्मा गांधींचे विचार आणि तत्त्वज्ञान यांनी आपल्या जीवनाला कशा प्रकारे दिशा दिली, त्यांचा प्रतिकूल परिस्थितीत सामना करताना कसा उपयोग झाला, याबाबत त्यांनी सविस्तर अनुभव कथन केले.
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात गांधीजींच्या विचारांचे महत्त्व कमी झालेले नसून, ते आजच्या पिढीलाही तितकेच मार्गदर्शक ठरू शकतात, असे त्यांनी आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. साधेपणा, प्रामाणिकपणा, संघर्षशीलता आणि मूल्यांशी असलेली बांधिलकी या गुणांनी जीवनाला कशी दिशा मिळू शकते, याची उदाहरणे त्यांनी आपल्या प्रवासातून दिली.
याचबरोबर समाजातील विषमता आणि सामाजिक तेढ यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात कोणत्या प्रकारचे कटू प्रसंग निर्माण होतात, याचेही अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. प्रतिकूल परिस्थिती ही अडथळा न मानता त्यातूनच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी करता येते, याचा प्रेरणादायी संदेश त्यांच्या कथनातून मिळाला.
या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. नवजीवनचे श्री. अनिल कांकरिया, परिवर्तनचे श्री. शंभू पाटील, दैनिक मार्केट स्पेशलचे मुख्य संपादक श्री. हेमंत वैद्य, श्री. हर्षल पाटील, लेले मॅडम, श्री. विलास देशमुख यांच्यासह साहित्यावर प्रेम करणारे अनेक रसिक उपस्थित होते.
‘लेखकाचे अभिवाचन’ या उपक्रमामुळे पुस्तकातील आशय केवळ वाचकांपुरता मर्यादित न राहता लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभवातून श्रोत्यांपर्यंत पोहोचला. संघर्षातून उभे राहण्याची जिद्द, मूल्यांशी असलेली नाळ आणि परिस्थितीवर मात करून यश संपादन करण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून उपस्थितांना मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिवर्तन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे आणि अमूल्य योगदान दिले. साहित्य, सामाजिक जाणीव आणि प्रेरणादायी जीवनप्रवास यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम साहित्यप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










