दुर्दैवी ! दहीहंडीचा डिजेसाठीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा मृत्यू
सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरु असताना पुण्यातील जुन्या सांगवी भागातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा (स्ट्रक्चर) डोक्यावर पडल्याने सलमा सलाउद्दीन पठाण या 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास जेव्हा मंडळाचे कार्यकर्ते लोखंडी सांगाडा खाली उतरवत होते, तेव्हा हा अपघात घडला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या यांचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
जन्माष्टमी निमित्त पुण्यातील जुन्या सांगवी भागात दहीहंडीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा (स्ट्रक्चर) काढताना अपधात झाला. दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास जेव्हा मंडळाचे कार्यकर्ते लोखंडी सांगाडा खाली उतरवत होते, तेव्हा त्याचा एक अवजड भाग अचानक खाली उभारलेल्या सलमा यांच्या थेट डोक्यात पडला आणि त्यांचा मृत्यू झाला.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











