सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी, जाणून घ्या संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर

*14 सप्टेंबरला गणेश चतुर्थीनिमित्त BSE आणि NSE बंद राहणार असल्याचे लेखात म्हटले आहे.
*शनिवार, रविवार आणि सोमवार मिळून बाजाराला सलग तीन दिवसांची सुट्टी असेल.
*MCXचे सकाळचे सत्रही बंद राहणार असल्याने कमोडिटी ट्रेडिंगचे नियोजन आधी करा.
जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यात शेअर बाजार सलग तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर काही खरेदी-विक्रीचा प्लॅन करत असाल तर आधीच त्याचं नियोजन करा. (BSE) मुंबई शेअर बाजार आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, दोन्ही 14 सप्टेंबर 2026 रोजी गणेश चतुर्थी असल्याने शेअर बाजार बंद राहणार आहे. उद्या कोणतेही काम होणार नाही.
सलग तीन दिवस सुट्टी
* 12 तारखेला शनिवार, * 13 तारखेला रविवार आहे. तसेच सोमवारी गणेश चतुर्थी असल्याने सोमवारी शेअर मार्कट बंद राहिल. त्यामुळे बाजार ३ दिवस बंद असेल. जर तुम्हाला शेअर घ्यायचे किंवा विकायचे असतील तर तुम्हाला मंगळवारपर्यंत वाट बघावी लागेल.
सोने-चांदीचा बाजार पण बंद
फक्त शेअर बाजारच नाही तर तुम्ही जर सोने, चांदी किंवा कमोडिटीमध्ये ट्रेड करत असाल तर तुमच्यासाठी पण ही बातमी आहे. MCX म्हणजे जिथे सोन्या-चांदीचा व्यवहार होतो, तिथे पण सोमवारी सकाळचं सेशन बंद राहणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालणारं हे सेशन गणेश चतुर्थीमुळे होणार नाही. त्यामुळे कमोडिटी मार्केटमध्ये पण त्या दिवशी शांतता असेल.
Stock Market Holiday:
मंगळवारपासून पुन्हा मार्केट सुरु
सुट्टी संपल्यावर मंगळवारी बाजार नेहमीसारखा सुरु होईल. सकाळी 9 ते 9:15 हा प्री-ओपन टाइम असेल आणि 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत नेहमीप्रमाणे ट्रेडिंग चालेल. आपला भारतीय शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार चालू असतो.
2026 मध्ये अजून कोणत्या सुट्ट्या आहेत ?
सप्टेंबर ते डिसेंबर या काळात अजून पण बऱ्याच सुट्ट्या आहेत. NSE ने 2026 चं कॅलेंडर जाहीर केलंय,
* 14 सप्टेंबर 2026 – गणेश चतुर्थी
* 2 ऑक्टोबर 2026 – गांधी जयंती
* 20 ऑक्टोबर 2026 – दसरा
* 10 नोव्हेंबर 2026 – दिवाळी, बलिप्रतिपदा
* 24 नोव्हेंबर 2026 – गुरु नानक जयंती
* 25 डिसेंबर 2026 – नाताळ
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











