Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन सचिव विनीत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या कार्यकारणी सदस्यपदी सलग दुसऱ्यांदा निवड

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 9, 2026
in jalgaon
0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन सचिव विनीत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या कार्यकारणी सदस्यपदी सलग दुसऱ्यांदा निवड
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन सचिव विनीत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या कार्यकारणी सदस्यपदी सलग दुसऱ्यांदा निवड

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नागपूर येथे पार पडली. या सभेत झालेल्या निवडणुकीत विनीत जोशी यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली.

या अनुषंगाने महाराष्ट्र बॅडमिंटन महासंघाने विश्वास दाखवून पुन्हा एकदा राज्याच्या कार्यकारिणीवर काम करण्याची त्यांना संधी दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या निवडणुकीत असोसिएशनच्या अध्यक्षपदी नागपूरचे अरुण लखानी, डेप्युटी प्रेसिडेंटपदी शिरीष बोराळकर, वरिष्ठ उपाध्यक्षपदी मंगेश काशिकर (नागपूर), सचिवपदी सिद्धार्थ पाटील (छत्रपती संभाजीनगर), तर मानद खजिनदारपदी जगदीश जोशी यांची निवड झाली आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बॅडमिंटनच्या विकासाला आणखी चालना मिळेल, असा मला विश्वास आहे असे मत त्यांनी मांडले.जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात बॅडमिंटनच्या विकासासाठी काम करण्याची संधी त्यांना मिळत आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विविध स्पर्धांचे आयोजन करणे, खेळाडू व प्रशिक्षकांना प्रोत्साहन देणे तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील अधिकाधिक खेळाडूंना बॅडमिंटनशी जोडणे यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या कार्यकारिणीवर सलग दुसऱ्यांदा मिळालेली संधी ही केवळ माझ्या कामाची दखल नसून जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी यांच्या सहकार्याचा आणि विश्वासाचा सन्मान आहे, असे ते म्हणाले.

राज्याच्या कार्यकारिणीवर काम करताना जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे करण्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील बॅडमिंटनच्या विकासासाठी सकारात्मक योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर अधिक चांगल्या संधी मिळाव्यात, त्यांच्यासाठी दर्जेदार स्पर्धांचे आयोजन व्हावे आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. अतुल भाऊंच्या मार्गदर्शनामुळे तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींच्या सहकार्यामुळे जळगावच्या बॅडमिंटन क्षेत्रात विविध उपक्रम राबविणे शक्य झाले आहे. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने जळगावच्या बॅडमिंटनला राज्याच्या नकाशावर अधिक भक्कमपणे पुढे नेण्याचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.

माझ्या निवडीबद्दल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. ही निवड माझ्यासाठी केवळ सन्मान नसून एक मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील बॅडमिंटनच्या सर्वांगीण विकासासाठी ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन असे त्यांनी दैनिक मार्केट स्पेशलशी बोलतांना सांगितले.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

HTML img Tag Simply Easy Learning

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

हिरवे शिवार समृद्धीचे द्वार, हिरवे शिवार समृद्धीचे द्वार

Next Post

नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी निलकांती यांची पहिली पोस्ट; लिहिले फक्त ‘हे’ ३ शब्द

Next Post
नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी निलकांती यांची पहिली पोस्ट; लिहिले फक्त ‘हे’ ३ शब्द

नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी निलकांती यांची पहिली पोस्ट; लिहिले फक्त 'हे' ३ शब्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697