SSC, HSC Exam 2027: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्डाच्या परीक्षेसाठी भरलेले शुल्क परत मिळणार; राज्य मंडळाचे शाळांना आदेश

ज्या विद्यार्थ्यांकडून दहावी, बारावी परीक्षेचे घेतलेले शुल्क शाळांनी अद्याप मंडळाकडे जमा केलेले नाही, त्या विद्यार्थ्यांचे शुल्क तत्काळ त्यांना परत करण्याचा आदेश राज्य मंडळामार्फत देण्यात आला आहे.
तसेच शुल्काची जबाबदारी पूर्णत: मुख्याध्यापकांची असल्याचेही राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे शुल्क माफ करण्याची सूचना मंडळामार्फत देण्यात आली आहे.
दुष्काळ जाहीर करण्यापूर्वीच राज्य मंडळामार्फत दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अद्यापही अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मंडळामार्फत अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेत विद्यार्थ्यांकडून शुल्कही भरून घेतले होते. यापैकी कित्येक विद्यार्थ्यांचे शुल्क अद्याप मंडळाकडे जमा करण्यात आलेले नाही. अशा विद्यार्थ्यांचे शुल्क शाळा स्तरावरूनच त्यांना परत करण्याचा आदेश मंडळामार्फत देण्यात आला आहे. परीक्षा शुल्क माफीच्या योजनेसाठी दुष्काळग्रस्त भागातील पुनर्परीक्षार्थीही पात्र असणार आहेत.
- ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जमा झालेले आहे, त्यांचे शुल्क थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार
- आधार क्रमांक चुकीचा असल्यास, संबंधित विद्यार्थी या सुविधेला मुकणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून योग्य ती माहिती शाळांना भरून घ्यावी लागणार
- दुष्काळग्रस्त भागातील ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अद्याप भरलेले नाहीत, त्यांचे अर्ज सात दिवसांत भरण्याची सूचना
- विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरताना, दुष्काळग्रस्त नोंद या पर्यायामध्ये माहिती भरण्याची मंडळाची सूचना
मुख्याध्यापकांवर पूर्ण जबाबदारी: .
ज्या शाळांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क अद्याप मंडळाकडे वर्ग केलेले नाही, त्यांनी ते तत्काळ विद्यार्थ्यांना परत करावे. या प्रक्रियेची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल.आधार जोडणी अनिवार्य: ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क मंडळाकडे जमा झाले आहे, त्यांचा परतावा आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. आधार क्रमांक किंवा माहिती चुकीची असल्यास विद्यार्थी या लाभापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे शाळांनी अचूक माहिती भरून घ्यावी.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











