Monday, November 23, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

India vs New Zealand : भारताचा ऐतिहासिक विजय, T20 मध्ये २०० सामने जिंकणारा पहिला देश

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 26, 2026
in jalgaon
0
India vs New Zealand : भारताचा ऐतिहासिक विजय, T20 मध्ये २०० सामने जिंकणारा पहिला देश
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

India vs New Zealand : भारताचा ऐतिहासिक विजय, T20 मध्ये २०० सामने जिंकणारा पहिला देश

HTML img Tag Simply Easy Learning

मुंबई : हॅगले ओव्हल मैदानावर झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या थरारक सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४ विकेट्सने धूळ चारली. या विजयासोबतच पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० सामने जिंकणारा भारत पहिला देश ठरला आहे.

१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था ५ बाद ७० अशी बिकट झाली होती. पण तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी सातव्या विकेटसाठी ६९ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला १८१ धावांपर्यंत पोहोचवलं आणि विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली असून अजून तीन सामने बाकी आहेत.

२००६ मध्ये T20 फॉरमॅटमध्ये पदार्पण केल्यापासून भारताने आतापर्यंत ३०० सामने खेळले आहेत. यापैकी २०० सामन्यांत भारताने बाजी मारली आहे, तर ८३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. उरलेले सामने टाय झाले किंवा त्यांचा निकाल लागला नाही. पूर्ण सदस्य देशांचा विचार केला तर भारताची विजयाची टक्केवारी ७१.२० इतकी जबरदस्त आहे.

सामन्याला कलाटणी देणारे क्षण

संकटात धावून आलेली भागीदारी

तिलक वर्माने नाबाद ४७ धावा केल्या, तर नितीश कुमार रेड्डीने अवघ्या १३ चेंडूत २६ धावांची स्फोटक खेळी केली. दबावाच्या परिस्थितीत या दोघांनीही शांत डोकं ठेवून फलंदाजी केली.

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी ११ धावांची गरज होती. पण या जोडीने कोणतीही गडबड न होऊ देता, एका चेंडू राखूनच सामना खिशात घातला. या दोघांनी केलेली ६९ धावांची भागीदारी ही T20 मध्ये सातव्या विकेटसाठी भारताची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. याआधी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्या यांनी ६३ धावांची भागीदारी केली होती.

न्यूझीलंडची पहिली इनिंग

याआधी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५ बाद १८० धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीच्या धक्क्यांमधून सावरत ग्लेन फिलिप्स आणि बेव्हॉन जेकब्स यांनी संघाचा डाव सावरला.

दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने टिम सेफर्टला बाद केलं. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने डॅरिल मिशेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. प्रिन्स यादवने फिन ऍलनला १६ धावांवर त्रिफळाचीत केलं. त्यामुळे पॉवरप्ले संपेपर्यंत यजमान न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ४१ अशी झाली होती.

त्यानंतर फिलिप्स आणि जेकब्स यांनी ११६ धावांची भक्कम भागीदारी करत डावाला आकार दिला. त्यांनी आक्रमक आणि समजूतदार फलंदाजीचा सुरेख मेळ साधला. फिलिप्सने ४३ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७० धावा चोपल्या. तर जेकब्सने ४६ चेंडूत ५८ धावांचं योगदान दिलं. १८ व्या षटकात नमन धीरने फिलिप्सचा झेल घेतला आणि त्यानंतर लगेचच जेकब्सही बाद झाला. मायकेल ब्रेसवेलने शेवटच्या क्षणी फक्त दोन चेंडू खेळत एक चौकार आणि एक षटकार मारला, ज्यामुळे न्यूझीलंडला १८० धावांचा टप्पा गाठता आला.

भारताचा यशस्वी पाठलाग

भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या. पण जेकब डफीने सॅमसनला बाद केलं.

त्यानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी अवघ्या ४ धावांवर बाद झाला. अभिषेक आऊट झाल्यानंतर अक्षर पटेल आणि कर्णधार श्रेयस अय्यर हे देखील स्वस्तात माघारी परतले. मिचेल सँटनरने न्यूझीलंडला सामन्यात परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सँटनरने १७ चेंडूत ३१ धावांची वेगवान खेळी करणाऱ्या नमन धीरलाही बाद केलं,

ज्यामुळे भारतीय संघ मोठ्या अडचणीत सापडला होता. पण एका बाजूने विकेट्स पडत असताना तिलक वर्माने एक बाजू लावून धरली. त्यानंतर रेड्डीने त्याला उत्तम साथ दिली आणि भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आता या दोन्ही संघांमधला तिसरा T20 सामना २७ ऑक्टोबरला वेलिंग्टनमध्ये खेळवला जाईल.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

SSC, HSC Exam 2027: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्डाच्या परीक्षेसाठी भरलेले शुल्क परत मिळणार; राज्य मंडळाचे शाळांना आदेश

Next Post

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले जळगावमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता वरिष्ठ...

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू ! राजस्थानमध्ये तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील एका कुटुंबावर...

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?   धुळे शहराच्या राजकारणात वैयक्तिक टीकेचा वाद आता...

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण   रक्ताच्या जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक...

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले  बिजिंग : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात...

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव! जळगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा...

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग   शहरातील पिंप्राळा परिसराकडे जाणाऱ्या...

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न! अमिताभ बच्चन सूत्रसंचालन...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

बोलताना शब्द जपून वापरा! 5 राशींच्या व्यक्तींची पैशाची तंगी कमी होणार; वाचा आजचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

बोलताना शब्द जपून वापरा! 5 राशींच्या व्यक्तींची पैशाची तंगी कमी होणार; वाचा आजचे राशीभविष्य मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा...

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697