देवपूजेसाठी बाल्कनीत फुले तोडायला गेले, पाय घसरला अन् बाप-लेक २३व्या मजल्यावरून खाली कोसळले

ग्रेटर नोएडातील एका हाय-राईज सोसायटीमध्ये एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. देवपूजेसाठी फुले तोडण्यासाठी बाल्कनीत गेलेल्या बाप-लेकाचा पाय घसरून २३व्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सदर घटना ग्रेटर नोएडाच्या ‘महागुन मायवुड्स सोसायटी’मध्ये घडला आहे. २३ मजल्यांच्या या इमारतीत शेवटच्या मजल्यावरून वडील आणि मुलाचा अपघात घडला आहे.
या दुर्घटनेत ४० वर्षीय रणदीप पात्रा आणि त्यांचा ११ वर्षीय मुलगा आरव यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नेमके काय झाले?
मयताच्या पत्नीने सांगितले की, कुटुंबाला सकाळी लवकर खाटू श्याम मंदिरात जायचे होते. रणदीप आणि त्याचा मुलगा पूजेसाठी फुले तोडायला बाल्कनीत गेले. पावसामुळे बाल्कनी ओली होती. प्राथमिक माहितीनुसार, फुले तोडताना रणदीप जिन्यावरून घसरला आणि हा अपघात घडला.
पावसामुळे बाल्कनी निसरडी झाली होती. मुलगा घसरला आणि बाल्कनीला लटकू लागला. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला आणि दोघेही खाली पडले. या अपघाताच्या परिस्थितीची पोलीस चौकशी करत आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
बिसरख पोलीस ठाण्याने दोन्ही मृतदेहांचा पंचनामा तयार करून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणात इतर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











