1 नोव्हेंबरपासून मोठे बदल; मोबाईल कॉलपासून LPG सिलेंडरपर्यंत अनेक नियम बदलणार, थेट तुमच्यावर परिणाम होणार

ऑक्टोबर महिना संपून (1 नोव्हेंबर) नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होत आहे. नवीन महिन्याच्या सुरुवातीबरोबरच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि खिशाशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत.
एलपीजी सिलेंडरच्या किमतीपासून ते मोबाईल कॉलिंग आणि पेन्शनर्सच्या नियमांपर्यंत अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा नेमका काय परिणाम होणार आहे, यावर एक नजर टाकूया…
मोबाईलवर दिसणार कॉलिंग करणाऱ्याचे खरे नाव
दूरसंचार विभागाने (DoT) सर्व टेलिकॉम कंपन्यांना 1 नोव्हेंबरपासून ‘सीएनएपी’ (CNAP – कॉलिंग नेम प्रेझेंटेशन) सेवा लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. या सुविधेमुळे आता मोबाईलवर येणाऱ्या इनकमिंग कॉलवर कॉलिंग करणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव आणि नंबर दिसणार आहे. 4G आणि 5G नेटवर्कवर ही सेवा लागू होणार असून, यामुळे फसवणूक करणाऱ्या आणि स्पॅम कॉल्सपासून मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल.
पेन्शनर्ससाठी ‘जीवन प्रमाण पत्र’ सादर करण्याची मुदत
सर्वसामान्य सरकारी पेन्शनर्ससाठी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान आपले ‘जीवन प्रमाण पत्र’ (लाईफ सर्टिफिकेट) जमा करणे बंधनकारक असते. हे प्रमाणपत्र वेळेत जमा न केल्यास पेन्शन बंद होऊ शकते. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा आधीच 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. पेन्शनर्स घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातूनही हे प्रमाणपत्र सहज जमा करू शकतात.
LPG सिलेंडरच्या किमतीत बदल
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती सुधारित करतात. 1 नोव्हेंबर रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ पाहता, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जीएसटी आणि आयटीआर (ITR) मधील महत्त्वाचे अपडेट्स
जीएसटी कौन्सिलच्या शिफारशीनुसार करदात्यांसाठी रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. कर परताव्याची प्रक्रिया ऑटोमेटेड करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच, ज्या करदात्यांसाठी टॅक्स ऑडिट आवश्यक आहे, त्यांच्यासाठी आर्थिक वर्ष 2025-26 चा आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
म्युच्युअल फंड आणि एफडीचे नियम
सेबी (SEBI) च्या नवीन नियमांनुसार, डिजिटल प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट म्युच्युअल फंड प्लॅन बाय-डिफॉल्ट ऑप्शन म्हणून जोडले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना रेगुलर प्लॅनचा खर्च समजून घेणे सोपे होईल. याशिवाय, बँका गरजेनुसार फिक्स डिपॉझिट (FD) च्या व्याजदरांमध्येही बदल करू शकतात.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











