Sunday, November 22, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

अंतराळात डेटा सेंटर… केगावच्या माळरानात तीन विद्यार्थ्यांचा प्रयोग!

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 8, 2026
in maharashtra
0
अंतराळात डेटा सेंटर… केगावच्या माळरानात तीन विद्यार्थ्यांचा प्रयोग!
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंतराळात डेटा सेंटर… केगावच्या माळरानात तीन विद्यार्थ्यांचा प्रयोग! ; २५.७ किलोमीटर उंचीवर बलूनमधून पाठविला संगणक; उणे ५५ अंशांतही एआयची यशस्वी चाचणी

पृथ्वीवर डेटा सेंटर उभारण्यासाठी जागा, पाणी आणि विजेची उपलब्धता हा जगभरात चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे. सोलापुरातही उजनीच्या पाण्यात डेटा सेंटर उभारण्याच्या मुद्द्यावरून आंदोलनने सुरू झाले आहेत.

अशा परिस्थितीत भविष्यात डेटा सेंटरसाठी पृथ्वीऐवजी अंतराळाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो का, या दिशेने सोलापूरच्या पार्थ कैरमकोंडा आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यांनी सोलापूरपासून अवघ्या दहा किलोमीटरवरील केगावच्या माळरानातून बलूनच्या साहाय्याने संगणक तब्बल २५.७ किलोमीटर उंचीवर पाठविला. तेथे उणे ५५ अंश सेल्सिअस तापमानातही संगणक आणि त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली कार्यरत राहिली. अंतराळातच संगणकीय केंद्रे उभारण्याच्या संकल्पनेच्या दृष्टीने हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे.

सोलापूरच्या पार्थ कैरमकोंडा याचे आदित्य शिंदे आणि श्लोक खैरनार हे कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड एआय अभियांत्रिकी पदवी शिक्षणातील वर्गमित्र आहेत. त्यांनी ‘बॉस्कॉन’ हा ग्रुप स्थापन केला आहे. अंतराळात एआयचा वापर आणि त्यासंबंधी संशोधन करणे, हे या ग्रुपचे उद्दिष्ट आहे. भविष्यात अंतराळातच संगणकीय केंद्रे उभारता येतील का, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी प्रथम तेथील प्रतिकूल वातावरणात संगणक आणि एआय प्रणाली काम करू शकते का, याची चाचणी घेण्याचे ठरवले. त्यासाठी बलूनच्या साहाय्याने छोटा संगणक आकाशात पाठविण्याचे नियोजन केले. या मोहिमेसाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणासह सोलापूर, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई विमानतळांच्या यंत्रणांची आवश्यक परवानगी घेण्यात आली.

असा केला प्रयोग..

शनिवारी (ता. ३१ अॉक्टोबर) रोजी दुपारी १२.३७ वाजता ‘एचएबी-१’ या मोहिमेंतर्गत केगाव परिसरातून बलूनसोबत संगणक आणि एआय प्रणाली आकाशात सोडण्यात आली. हा संगणक तब्बल २५.७ किलोमीटर उंचीवर पोहोचला. या उंचीवर बाहेरील तापमान उणे ५५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले, तरी संगणकाने काम करणे सुरूच ठेवले. दोन तासानंतर धाराशिव जिल्हात दुपारी २.४१ वाजता बलून सुखरूप उतरवण्यात आला.

इंटरनेटशिवाय एआयचे काम

१. या संगणकाला पृथ्वीवरील कोणत्याही संगणकाची किंवा इंटरनेटची मदत उपलब्ध नव्हती. त्यामध्ये आधीच कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रणाली बसविण्यात आली होती. त्यामुळे स्वतःच्या सेन्सरद्वारे मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून ती उत्तरे तयार करू शकत होती. प्रयोगादरम्यान एआयने एकूण ४११ प्रतिसाद दिले. त्यापैकी २०४ प्रतिसाद प्रत्यक्ष उड्डाण सुरू असताना दिले.

२. या मोहिमेसाठी कम्‍प्यूट डिव्हाईस या छोट्या संगणकामध्ये १.५ बिलियन पॅरामीटर क्षमतेचे एआयचे मॉडेल वापरले गेले. बलून सात किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर संगणक आणि एआय प्रणाली कार्यरत झाली. त्यानंतर २५.७ किलोमीटर उंची गाठेपर्यंत आणि परतीच्या प्रवासातही ती सुरू राहिली. दोन कॅमेऱ्यांतून सभोवतालच्या दृश्यांची नोंदही करण्यात आली.

उष्णता नियंत्रणासाठी संगणकाने कमी केला वेग

अंतराळासारख्या वातावरणात संगणक चालवताना कमी तापमानाबरोबरच संगणकाच्या आत निर्माण होणारी उष्णता बाहेर काढणे, हेही मोठे आव्हान असते. या प्रयोगात बाहेरचे तापमान उणे ५५ अंश सेल्सिअस असताना संगणकाच्या प्रोसेसरचे तापमान मात्र ८६.४५ अंशांपर्यंत पोहोचले. सुमारे ६५ मिनिटे तापमान ८० अंश किंवा त्यापेक्षा अधिक होते. उष्णता नियंत्रित करण्यासाठी संगणकाने स्वतःच्या कामाचा वेग कमी केला. मात्र, या संपूर्ण काळात संगणक बंद पडला नाही.

पृथ्वीवर पोहोचली फक्त ३० केबी माहिती

या प्रयोगात संगणकाने ५० गिगाबाइट (जीबी) माहिती साठवली. मात्र, रेडिओ संपर्काद्वारे पृथ्वीवर ३० केबीपेक्षाही कमी माहिती पाठवता आली. भविष्यात एआयच्या मदतीने मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून त्यातील महत्त्वाचे निष्कर्ष कमी आकारात पृथ्वीवर पाठवता येतील का, याचा अभ्यास करता येणार आहे

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

HTML img Tag Simply Easy Learning

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील ७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

Next Post

ब्राह्मण समाज नेमका कुठे चुकतोय? प्रशांत किशोर यांनी समजावलं ब्राह्मण, मुस्लिम मतांचं गणित

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
ब्राह्मण समाज नेमका कुठे चुकतोय? प्रशांत किशोर यांनी समजावलं ब्राह्मण, मुस्लिम मतांचं गणित

ब्राह्मण समाज नेमका कुठे चुकतोय? प्रशांत किशोर यांनी समजावलं ब्राह्मण, मुस्लिम मतांचं गणित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले   जळगाव साफसफाई व कचरा संकलन करणारा मक्तेदार बी.व्ही.जी. कंपनीचे...

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा? जळगाव : शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेता...

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला...

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, 'तोतया साहेबा'ला बेड्या   मंत्रालयातील शिक्षण विभागाचा...

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड! कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर मिळवली संधी,ऑटोकॅड आणि क्रेओ मधील कौशल्याचा करिअरला...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य…

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार ? आजचे राशीभविष्य...   वैदिक पंचांगानुसार, आज,...

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697