Sunday, November 22, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

235 पूल, 45 गावं, 825 एकर जमीन अन् ₹10,145 कोटींचं बजेट… महाराष्ट्रात रेल्वेचा मेगा प्रोजेक्ट; लाखो प्रवाशांना होणार फायदा

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 11, 2026
in jalgaon
0
235 पूल, 45 गावं, 825 एकर जमीन अन् ₹10,145 कोटींचं बजेट… महाराष्ट्रात रेल्वेचा मेगा प्रोजेक्ट; लाखो प्रवाशांना होणार फायदा
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

235 पूल, 45 गावं, 825 एकर जमीन अन् ₹10,145 कोटींचं बजेट… महाराष्ट्रात रेल्वेचा मेगा प्रोजेक्ट; लाखो प्रवाशांना होणार फायदा

 

HTML img Tag Simply Easy Learning

रेल्वे प्रशासाने 10 हजार 145 कोटी रुपयांचा एक मेगा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रोजेक्टमुळे मुंबई ते नाशिक प्रवास अधिक सुखकर होणार असून या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होऊन प्रवासी क्षमता वाढणार आहे.

हा प्रकल्प नेमका आहे कसा? यासाठी कुठली जमीन सरकारला घ्यावी लागणार आहे? नेमका कोणत्या भागांना जोडणार हा प्रोजेक्ट जाणून घेऊयात…

45 गावांमधील 825 एकरांहून अधिक जमीन करणार अधिग्रहित

तर रेल्वे प्रशासनाचा हा महत्त्वकांशी प्रोजेक्ट कसारा-मनमाडदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गासंदर्भातील आहे. यासाठी 45 गावांतील जमिनींचे अधिग्रहण केले जाणार आहे. ही गावं नाशिकसहीत एकूण पाच तालुक्यांमधील असून या शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या जाणार आहेत. एकूण 825.33 एकर म्हणजे 334 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.

कसा असणार हा प्रोजेक्ट?

या प्रकल्पामुळे मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रादरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. कसारा-मनमाड दरम्यान, 24 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्यात येणार रेल्वे मार्गावर 21 भुयारी मार्गांची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 10 हजार 145 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.

प्रवासी वाहतुकीसोबत मालवाहतुकीलाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी, अतिरिक्त 4 कोटी 61 लाख टन मालवाहतूक हाताळणे या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. उद्योग, व्यापार, शेतीमाल वाहतूक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

235 लहान-मोठे पूल

कसारा-मनमाड मार्गावर एकूण 235 लहान-मोठे पूल उभारले जाणार असून यापैकी तीन महत्त्वाचे पूल असून 16 पूल मोठे तर 218 लहान पूल असतील. तसेच कसारा ते इगतपुरी या थळ घाट विभागात पाच नवीन बोगदे बांधले जाणार आहेत.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, कसारा घाटातील तीव्र चढामुळे सध्या गाड्यांना मागे ‘बँकर इंजिन’ जोडावे लागतात. नवीन मार्गिकांचा उतार सुसह्य असल्याने बँकर इंजिनांची गरज राहणार नसून यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

कोणत्या तालुक्यात किती गावं? थेट लोकल सुरु करण्याची संधी

निफाड तालुक्यातील 17 गावांमधील जमीन यासाठी वापरली जाणार आहे. तसेच नाशिकमधील 16, चांदवड तालुक्यातील 7, इगतपुरीमधील चार आणि नांदगावमधील एका गावातून या प्रकल्पाअंतर्गत उभारली जाणारी मार्गिका जाणार आहे. सध्या हा मार्ग 138 टक्के क्षमतेने चालतो. चार मार्गिका पूर्ण झाल्यावर अधिक प्रवासी गाड्या या मार्गावर धावू शकतील आणि भविष्यात नाशिक ते मुंबई थेट लोकल सेवा सुरू करण्याचा मार्गही मोकळा होईल अशी अपेक्षा आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

“हाता पाया पडूनही गुंड थांबले नाहीत!” चाकणमध्ये भररस्त्यात एसटी बस अडवून चालकाला बेदम मारहाण अन्.

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ११ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्या — १२ सप्टेंबर २०२६

जळगाव जिल्ह्यातील ११ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले   जळगाव साफसफाई व कचरा संकलन करणारा मक्तेदार बी.व्ही.जी. कंपनीचे...

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा? जळगाव : शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेता...

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला...

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, 'तोतया साहेबा'ला बेड्या   मंत्रालयातील शिक्षण विभागाचा...

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड! कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर मिळवली संधी,ऑटोकॅड आणि क्रेओ मधील कौशल्याचा करिअरला...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य…

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार ? आजचे राशीभविष्य...   वैदिक पंचांगानुसार, आज,...

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697