जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?

निवडणूक निर्णय अधिकारी आणि नाशिकसह निबंधकांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडण्या बाबतचा मार्ग सुकर झाला असल्याच मानले जात आहे.
जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीमध्ये भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाल्याचं मानले जात आहे. त्यांच्या विरोधात जामनेर तालुका (Jalgaon Bank Election) विकास सोसायटीमधून उभ्या असलेल्या रघुनाथ सखाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणास्तव बाद केला होता, त्या विरोधात रघुनाथ पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सह निबंधकांच्या कडे आपला अर्ज वैध (Jalgaon Bank Election) करण्याच्या संदर्भात दाद मागितली होती. मात्र नाशिक येथील सह निबंधकांनी ही त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे, सहनिबंधकांच्या या निकालानंतर रघुनाथ पाटील हे न्यायालयात आता दाद मागू शकणार (Jalgaon Bank Election) आहेत. न्यायालयात काय निर्णय होतो हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी निवडणूक निर्णय अधिकारी आणि नाशिकसह निबंधकांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडण्या बाबतचा मार्ग सुकर झाला असल्याच मानले जात आहे.(Jalgaon Bank Election)
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कायम
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुती मधील जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे, विरोधकांना एकही जागा मिळणार नाही, महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं असलं तरी, महायुती मधील जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सोडविण्यात, महायुतीच्या नेत्यांना यश आलेले दिसत नसल्याने, ही निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांच्या साठी येत्या 29 तारखेला निवडणूक होत आहे,या निवडणुकीपूर्वीच तीन जागा बिनविरोध झाल्या आहे.
उर्वरित जागांच्यासाठी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या प्रमुख आमदाराच्यामधे दोन बैठका पार पडल्या आहेत, या दोन्ही बैठका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या ,आणि नव्वद टक्के ठिकाणी जागा वाटप बाबत आमच एक मत झालं असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल आहे तरी, मुक्ताईनगर तालुक्यासह, पाचोरा भडगाव, आणि चोपड्याच्या जागाबाबत तिढा सुटण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाही आहेत. मुक्ताईनगरमधे मंत्री रक्षा खडसे या उमेदवार असून त्यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक राहिलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आ चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते विनोद तराळ आणि देवयानी देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
मंत्री रक्षा खडसे आणि आ चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने, कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने, या ठिकाणचा तिढा पाहता, या ठिकाणी महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत, अशाच प्रकारे पाचोरा येथील शिवसेना शिंदे गटाचे आ किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील हे रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात पाचोरा तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे काका सतीश शिंदे हे रिंगणात आहेत, याठिकाणीही भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांमधील राजकीय वैमनस्य सगळ्यांना माहीत असल्याने, या ठिकाणीही माघार घेण्यास कोणीही तयार नसल्याने, याठिकांचा तिढा सोडविणे महायुतीच्या नेत्यांच्यासाठी कठीण होताना दिसत आहे. चोपडा येथेही भाजपचे रोहित निकम हे उमेदवार आहेत,त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे घनशाम अग्रवाल हे उमेदवार असून याठिकांचा जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने, जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीच्यामधे जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. या जागेचा तिढा ही लवकरच सोडविला जाईल असे मंत्री गिरीश महाजन सांगत असले तरी, हा तिढा सुटण्याची चिन्हे आज तरी दिसत नसल्याने, या ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











