Thursday, August 27, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

आंब्याच्या झाडावर आश्रय… माय-लेकाचा १० तास मृत्यूशी संघर्ष; पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना!

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 25, 2026
in maharashtra
0
आंब्याच्या झाडावर आश्रय… माय-लेकाचा १० तास मृत्यूशी संघर्ष; पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालघर: पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच नागझरी गावात घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. सूर्या नदीला आलेल्या भीषण पुरामुळे एका माय-लेकावर तब्बल १० तास आंब्याच्या झाडावर आश्रय घेऊन मृत्यूशी झुंज देण्याची वेळ आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीचे पाणी वेगाने वाढू लागले. काही क्षणांतच पुराचे पाणी गावात शिरले आणि परिसर पूर्णपणे जलमय झाला. जीव वाचवण्यासाठी माय-लेकाने जवळील आंब्याच्या झाडावर चढून आश्रय घेतला. मात्र, पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने आणि वेगवान प्रवाहामुळे त्यांना खाली उतरता येत नव्हते. गळाभर पाणी आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे दोघांच्याही जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.

HTML img Tag Simply Easy Learning


घटनेची माहिती मिळताच पालघर तहसील प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत आणि नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर वसई-विरार महानगरपालिकेच्या आचोळे येथील मुख्य अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या अंधारात आणि वेगवान पुराच्या पाण्यात स्पीड बोटीच्या सहाय्याने धाडसी बचाव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अग्निशमन अधिकारी दीपक पाटील यांच्यासह भूपेश भोईर, सागर पाटील, स्वप्नील पाटील, परेश घाग, धनाजी मुलीक आणि दर्शन पाटील यांनी जीवाची पर्वा न करता माय-लेकाची सुखरूप सुटका केली.
दरम्यान, किराट गावाजवळील सूर्या नदीच्या पुरामुळे अनेक पाड्यांमध्ये नागरिक अडकून पडल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे, मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
पुराच्या विळख्यातून २७ नागरिकांची सुखरूप सुटका
एनडीआरएफच्या धाडसी मोहिमेत ४ लहान मुलांसह ५ महिला, एकूण २७ नागरिक आणि २ श्वानांची सुरक्षित सुटका करण्यात आली. वेगवान पाण्याचा प्रवाह, अंधार आणि सततचा पाऊस अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जवानांनी धैर्याने बचावकार्य पूर्ण केले.
या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व एनडीआरएफचे इन्स्पेक्टर महेंद्र सिंह पूनिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपनिरीक्षक नंदकिशोर पावडे, हेड कॉन्स्टेबल सुरेश कदम आणि संपूर्ण एनडीआरएफ पथकाने समन्वय, तत्परता आणि शौर्याचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत अनेकांचे प्राण वाचवले.
सध्या पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच आवश्यकतेशिवाय पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

MBBS डॉक्टरांसाठी सर्वात मोठी बातमी! राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ‘हा’ मोठा नियम अखेर रद्द

Next Post

मोठी बातमी! अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; टायफॉईडचे निदान, आंदोलन सुरूच राहणार

Next Post
मोठी बातमी! अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; टायफॉईडचे निदान, आंदोलन सुरूच राहणार

मोठी बातमी! अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; टायफॉईडचे निदान, आंदोलन सुरूच राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील साखरेच्या...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध ताज्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत. १. ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; बालकाचा मृत्यू,...

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

‘गुरुजी परत द्या, नाहीतर आमच्या ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढा’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक आज राज्यात एक ठिकाणी विद्यार्थी आपल्या...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697