Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

अपघातात पाय गमावला, बॉक्सरचा गोळाफेकपटू झाला… सोनम राणाचे ऐतिहासिक सुवर्ण; भारताच्या खात्यात आणखी दोन रौप्य

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
August 1, 2026
in sports
0
अपघातात पाय गमावला, बॉक्सरचा गोळाफेकपटू झाला… सोनम राणाचे ऐतिहासिक सुवर्ण; भारताच्या खात्यात आणखी दोन रौप्य
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अपघातात पाय गमावला, बॉक्सरचा गोळाफेकपटू झाला… सोनम राणाचे ऐतिहासिक सुवर्ण; भारताच्या खात्यात आणखी दोन रौप्य

वृत्तसंस्था-

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी शनिवारी दमदार कामगिरी करत पदकांची लय कायम राखली. दिवसाची सुरुवात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदकाने झाली आणि त्यात आणखी एका रौप्यपदकाची भर पडली. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिला तो बिहारच्या सोनम राणा याचा प्रेरणादायी प्रवास.

HTML img Tag Simply Easy Learning

एकेकाळी राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर असलेला सोनम आज पॅरा अॅथलेटिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा नायक ठरला आहे. पुरुषांच्या गोळाफेक F57 प्रकारात त्याने १३.४० मीटर अंतर फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला, तर उत्तराखंडच्या शुभम जुयाल याने १३.२८ मीटर अंतरासह रौप्यपदक पटकावले.

भूसुरुंग अपघाताने बदलले आयुष्य

‘२ गोर्खा रायफल्स’मधील माजी जवान असलेला सोनम राणा २००५ च्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर होता. भारताच्या आशादायी बॉक्सरपैकी त्याची गणना होत होती. मात्र २००६ मध्ये झालेल्या भूसुरुंग अपघातात त्याचा एक पाय गमवावा लागला आणि त्याच्या आयुष्याला मोठे वळण मिळाले.

या भीषण प्रसंगानंतरही त्याने हार मानली नाही. पुनर्वसनानंतर त्याने पॅरा अॅथलेटिक्समध्ये प्रवेश केला आणि गोळाफेक हा नवा खेळ स्वीकारला. गेल्या वर्षी त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक, तर आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकून आपली क्षमता सिद्ध केली होती. आता राष्ट्रकुल स्पर्धेतील हे ऐतिहासिक सुवर्ण त्याच्या संघर्षाला सुवर्णमुकुट ठरले आहे.

शुभम जुयालचेही दमदार यश

भारतीय सैन्यात लान्स नाईक म्हणून कार्यरत असलेल्या शुभम जुयालनेही उल्लेखनीय कामगिरी केली. अंतिम फेरीत सातत्यपूर्ण प्रदर्शन करत त्याने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. कॅमेरूनच्या सेड्रिक एजामड्झी याने १२.५७ मीटर अंतरासह कांस्यपदक जिंकले.

बॉक्सिंगमध्ये भारताची सुवर्णमय कामगिरी

भारतीय महिला बॉक्सरनीही शनिवारी सुवर्णपदकांची बरसात केली.

प्रीती पवार (५४ किलो) – कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडोवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले.

जैस्मिन लॅम्बोरिया (५७ किलो) – आयर्लंडच्या मिचेला वॉल्शचा ५-० ने पराभव करून सुवर्णपदक पटकावले.

पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात भारताच्या जादुमणी सिंग याला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जये डिक्सन कडून ०-५ असा पराभव स्वीकारावा लागला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मणिपूरच्या इरोइशेंबा येथील जादुमणी भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व करतो.

तिहेरी उडीत रौप्य आणि कांस्य

भारतीय अॅथलेटिक्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात भारताने दोन पदके जिंकली.

प्रवीण चित्रवेल – रौप्यपदक

सेल्वा प्रभू थिरूमारन – १६.५२ मीटर उडीसह कांस्यपदक

विशेष म्हणजे २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अवघ्या ३ सेंटीमीटरने कांस्यपदक हुकलेला प्रवीण यावेळी चार वर्षांनंतर थेट रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला.

ज्युडोमध्येही भारतीयांची आगेकूच

ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठत आशा जिवंत ठेवल्या.

उन्नती शर्मा (६३ किलो) – न्यूझीलंडच्या कोना क्रिस्टीवर विजय

करणजीत सिंग मान (९० किलो) – न्यूझीलंडच्या इलियट कॉनोलीवर मात

पुढील स्पर्धांकडे लक्ष

पॅरा अॅथलेटिक्समध्ये रमेश षण्मुगम याने पुरुषांच्या १५०० मीटर T54 शर्यतीची अंतिम फेरी गाठली आहे. तसेच महिलांच्या १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत भारताच्या प्रियांका गोस्वामी आणि रविना गायकवाड पदकासाठी मैदानात उतरणार आहेत.

भारताची शनिवारी प्रमुख पदकं

1) प्रकार-गोळाफेक F57

खेळाडू-सोनम राणा

पदक-सुवर्ण

2) प्रकार- गोळाफेक F57

खेळाडू-शुभम जुयाल

पदक-रौप्य

3) प्रकार-बॉक्सिंग ५४ किलो

खेळाडू-प्रीती पवार

पदक-सुवर्ण

4) प्रकार -बॉक्सिंग ५७ किलो

खेळाडू-जैस्मिन लॅम्बोरिया

पदक-सुवर्ण

5) प्रकार-बॉक्सिंग ५५ किलो

खेळाडू-जादुमणी सिंग

पदक-रौप्य

6) प्रकार- तिहेरी उडी

खेळाडू-प्रवीण चित्रवेल

पदक-रौप्य

7) प्रकार-तिहेरी उडी

खेळाडू-सेल्वा प्रभू थिरूमारन

पदक-कांस्य

सोनम राणाची कहाणी ही केवळ एका सुवर्णपदकाची नाही, तर अपंगत्वावर मात करून नव्याने उभं राहण्याच्या अदम्य जिद्दीची प्रेरणादायी गाथा आहे. भूसुरुंग अपघाताने त्याचा पाय हिरावला, पण त्याची स्वप्ने हिरावू शकली नाहीत; म्हणूनच राष्ट्रकुल स्पर्धेतील हे सुवर्ण भारतीय क्रीडाजगतासाठी विशेष ठरले आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

२०१६ पूर्वीच्या वाहनधारकांना दिलासा!

Next Post

सुलभा प्रभाकर जोशी यांचे निधन झाले

Next Post
सुलभा प्रभाकर जोशी यांचे निधन झाले

सुलभा प्रभाकर जोशी यांचे निधन झाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697