जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा. विद्यालयात शुक्रवारी (दि. ३१) सकाळी शालांत परीक्षा पारितोषिक व सन्मान पदक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. संगीत शिक्षिका संपदा तुंबळे व उल्हास ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी डॉ. गिरीश सहस्त्रबुद्धे, कार्यक्रमाध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशीलदादा अत्रे, विश्वस्त प्रेमचंद ओसवाल, सचिव अभिजीत देशपांडे, ज्येष्ठ संचालक प्रा. शरच्चंद्र छापेकर आणि मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय वानखेडे यांनी केले. मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करत वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. रमा तारे यांनी करून दिला. यानंतर प्रमुख अतिथी डॉ. गिरीश सहस्त्रबुद्धे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सरस्वतीमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माध्यमिक विभागातील गुणवंत विद्यार्थी साई तुषार पाटील (९५.३%), दिशा वीरेंद्रकुमार चांडक (९६.४%), नम्रता राजेश पाटील (संस्कृत प्रथम), वरद नामदेव सूर्यवंशी (सामाजिक शास्त्र प्रथम), टिशा प्रवीण नेहेते (इयत्ता ९ वी प्रथम – ९०.५%), दिशा भरत पाटील (९६.१७%), खुशाली अतुल पाटील (९३%), ललित योगेश घुगे (९५%), अश्विनी विजय घुगे (९३.६%), केशव विनोद मराठे (९३.४%) आणि राहुल ज्ञानेश्वर बारसे (९२%) यांचा सन्मान पदक, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. विविध विषयांत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही रोख पारितोषिक व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या साई तुषार पाटील यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षक, पालक व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख अतिथी डॉ. गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळ, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यांनाही समान महत्त्व देत सुदृढ व आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन केले. अध्यक्ष ॲड. सुशीलदादा अत्रे यांनी मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून दूर राहून जीवनातील विविध क्षेत्रांत यश संपादन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमास ॲड. पंकज अत्रे, सचिन दुनाखे, पद्मजा अत्रे, मिराताई गाडगीळ, लताताई छापेकर, लीना कुलकर्णी, अर्पणा मुळे, जितेंद्र वानखेडे, प्रशांत जगताप, संजय वानखेडे, रमा तारे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देणगीदार सूचीचे वाचन सौ. स्मिता तारे यांनी, तर सन्मान पदक व पारितोषिक यादीचे वाचन सौ. प्राजक्ता गोहिल यांनी केले. सूत्रसंचालन सौ. रेवती किन्हीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जगदीश साळुंखे यांनी मानले.
समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी देणगीदार, पालक-शिक्षक संघ, बक्षीस वितरण समितीचे प्रमुख जगदीश साळुंखे, स्मिता करे, प्राजक्ता गोहिल, आनंद पाटील, आनंद चौधरी, पंकज खंडाळे, पंकज महाले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










