Sunday, November 22, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

जळगाव : वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी १५ हजारांची लाच; महावितरणचा सहाय्यक अभियंता, दोन वरिष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 15, 2026
in jalgaon
0
जळगाव : वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी १५ हजारांची लाच; महावितरणचा सहाय्यक अभियंता, दोन वरिष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी १५ हजारांची लाच; महावितरणचा सहाय्यक अभियंता, दोन वरिष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात


सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
जळगाव : घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे आणि सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणात त्याच्यासोबत असलेल्या दोन वरिष्ठ तंत्रज्ञांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
विशाल वसंत नेमाडे (३७ वर्षे, पद: सहाय्यक अभियंता, वर्ग-२, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जळगाव शहर महसूल व देयक उपविभाग, जळगाव; रा. प्लॉट नं. ६, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ, योगेश्वर नगर, जळगाव), भरत कडू तायडे (४५ वर्षे, पद: वरिष्ठ तंत्रज्ञ, वर्ग-३, महावितरण; रा. प्लॉट नं. ३७, गट नं. १८५/४, न्यू लक्ष्मीनगर, सावखेडा शिवार, कोल्हे हिल्सजवळ, जळगाव) आणि रवींद्र छन्नू पाटील (४१ वर्षे, पद: वरिष्ठ तंत्रज्ञ, वर्ग-३, महावितरण; रा. फ्लॅट नं. २०४, पंडित कॉर्नर अपार्टमेंट, जळगाव; मूळ रा. झुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव), अशी लाचप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
नेमकी घटना काय?
यातील तक्रारदार (४० वर्षे) हे जळगाव शहरातील रहिवासी आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास वरील तिन्ही संशयितानी तक्रारदारांच्या घरी जाऊन नवीन वीज मीटरची तपासणी केली. तसेच मीटर आणि विद्युत उपकरणांचे फोटो काढले. त्यानंतर संशयित भरत तायडे याने तक्रारदाराला फोन करून जळगावातील पांडे चौक येथे बोलावून घेतले. तेथे तिघांनी तक्रारदाराच्या घरातील लोड जास्त असून सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याचा दावा केला. वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी त्यांनी तक्रारदारांकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तत्काळ जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
पडताळणी आणि सापळा कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी केली असता, भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांनी स्वतःसाठी तसेच सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांच्यासाठी सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी करून तडजोडअंती १५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. ठरल्याप्रमाणे पांडे चौक येथे सापळा रचण्यात आला. तेथे तायडे याने तक्रारदाराला लाचेची रक्कम विशाल नेमाडे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार नेमाडे यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम सात आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोहवा बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने आणि पोकॉ मनोज पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली.
HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

जळगावातील श्रीमती मंदाताई प्रभाकर जोशी यांचे निधन

Next Post

‘भारत टॅक्सी’ आजपासून पुणेकरांच्या सेवेत! भाडं राहणार ‘फिक्स’ अन् पारदर्शक

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
‘भारत टॅक्सी’ आजपासून पुणेकरांच्या सेवेत! भाडं राहणार ‘फिक्स’ अन् पारदर्शक

'भारत टॅक्सी' आजपासून पुणेकरांच्या सेवेत! भाडं राहणार 'फिक्स' अन् पारदर्शक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले   जळगाव साफसफाई व कचरा संकलन करणारा मक्तेदार बी.व्ही.जी. कंपनीचे...

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा? जळगाव : शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेता...

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला...

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, 'तोतया साहेबा'ला बेड्या   मंत्रालयातील शिक्षण विभागाचा...

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड! कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर मिळवली संधी,ऑटोकॅड आणि क्रेओ मधील कौशल्याचा करिअरला...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य…

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार ? आजचे राशीभविष्य...   वैदिक पंचांगानुसार, आज,...

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697